Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नोकरी महोत्सवात मिळाला हजारो बेरोजगारांना रोजगार

 खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नोकरी महोत्सवात मिळाला हजारो बेरोजगारांना रोजगार

                   ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर

शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली पूर्वेतील होरायझोन हॉल येथे आयोजित या नोकरी महोत्सवामध्ये शंभर नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये हजारो बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली.  डोंबिवलीत पार पडलेल्या या नोकरी महोत्सवाला तरुण-तरुणीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक कंपन्याच्या स्टॉलवर तरुण-तरुणींनी  आपल्या कागद पत्रासह मोठ्या संखने गर्दी करुन रोजगारासाठी प्रयत्न केले. विशेषतः डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागातून हजारो तरुण-तरुणी या नोकरी महोत्सवात रोजगार उपलब्ध होईल या आशेने आले होते.

      याठिकाणी १०वी, १२वी, पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री आदी शैक्षणिक पात्रतेच्या तरुण तरुणींनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला होता. मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स अँड मार्केटिंग, हॉस्पिटलीटी, टेलिकॉम, बीपीओ, केपीओ, आयटी, फार्मा आदी क्षेत्रात या बेरोजगारांना रोजगार मिळाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या रोजगार महोत्सवाचा लाभ कल्याण लोकसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगारांनी घेतला असून त्यांना त्वरित नियुक्तीपत्र दिली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments