Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्राला डावलणाऱ्या अर्थसंकल्पाचा राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध

 महाराष्ट्राला डावलणाऱ्या अर्थसंकल्पाचा राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध

                 ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

२०२४ च्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काहीच न दिल्यामुळे महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या  वतीने निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने काल अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीच मिळाले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनता निराश झालेली असून या केंद्र सरकारने सोन्याचा भाव कमी करून परत एकदा दाखवून दिलं की आम्ही श्रीमंतांच्या बाजूने आहोत गोरगरिबांशीं आम्हाला काही घेणे देणे नाही.  आजही देशात गोरगरीब लोकांना एक वेळेचे जेवण नाही पण त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची रोजगाराची ठोस उपाय योजना यामध्ये दिसली नाही.  यामुळे या मुजोर केंद्र सरकारचा कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.



यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, राजेश शिंदे, प्रशांत माळी, विजय मोरे, काझीम कांबले, जे. सी. कटारिया, रमेश साळवे, कोनकर, रोकडे, विनायक काळन, अशोक रजपूत, निमेश, ओम सावंत, निखिल कदम, स्वप्निल शेळके, महिला पदधिकारी सुनीता देशमुख अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments