रूंदे पुल पाण्याखाली १०ते१२गावाचा संपर्क तुटला
जनजीवन विस्कळीत
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल दोन दिवसाच्या धुवाधंर पावसामुळे बुधवारी पाण्या खाली गेल्याने १० ते१२ गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी त काळुनदी च्या पाण्याखाली पुल जात असल्याने येथील रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव उशीद,मढ, दानबाव, पळसोली, शेई,अंबरजे,काकडपाडा, कुंभारपाडा, ,गेरसे आदी १०ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटतो.
पाण्या खाली गेलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने व नवीन पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे रूंदे पुल पाण्याखाली जात असल्याने वासिंद खडवली टिटवाळा भागाशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे रूग्णांना, शालेय विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसाय करणा-या अनेक नागरिकांना यांचा फटका बसत असुन यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण तालुक्यातील रुंदे काळू नदीवरील यंदा च्या पावसाळ्यात आतापर्यंत दुसऱ्यादा पाण्याखााली पूल गेल्याने जनजीवन विस्कळीत होते आता तरी प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देत नवीन उंच पुल बांधवा अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु लागली असल्याचे स्थानिक परमवीर पाटील यांनी सांगितले. कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याण तालुक्यातील मागील पाऊस १२०९.०० मि.मी., आजचा पाऊस ५९.०० मि.मी., एकूण पाऊस - १२६८.०० मि.मी. पडला आहे. तसेच टिटवाळा परिसरात काळू नदी ने धोक्याची इशारा पातळी ओलांडलीची माहिती मिळाली.
.jpg)

Post a Comment
0 Comments