मुलींना शिक्षणाची संधी दिली पाहिजे – माजी मंत्री जगन्नाथ पाटील
आगरी युथ फोरमच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व जाहीर सत्कार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अनेक लग्नंसमारंभात गेल्यावर कळते कि मुलीचे शिक्षण १२ वी पर्यंतच झाले आहे. बारावी हे शिक्षण लग्नासाठी नसून आपण सगळ्यांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. मुली चांगल्या शिकतात आणि मुलांपेक्षा अधिक जास्त चांगले गुण मिळवतात असे प्रतिपादन माजी मंत्री आणि जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी केले. आगरी युथ फोरम, डोंबिवली यांच्या वतीने इयत्ता १० वी उत्तीर्ण पदवी, पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील होरायजोन सभागृह येथे संपन्न झाला, यावेळी जगन्नाथ पाटील बोलत होते.
भाजी विकणाऱ्या बाईचा मुलगा सीए होतो. श्रीमंतांच्या घरातला खूप शिकलेल्या लोकांच्या घरातला मुलगा मुलगी शिकली तर त्याचं कौतुक नाही, कारण ते घर श्रीमंतांचे शिकलेल्यांच आहे. पण ज्याच्या घरामध्ये कोणी शिकलेला नाही ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे अशा घरातला मुलगा शिकला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे असेही यावेळी पाटील म्हणाले.
ज्या मुलांचे सत्कार केले त्या मुलांच्या गावात जाऊन एकदा बैठक करून आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे याच्या वरती आग्रह धरून मोबाईल फोन वापरला पाहिजे हे बरोबर आहे टीव्ही पाहायला पाहिजे हे बरोबर आहे पण त्याबरोबर वाचन संस्कृती वाढवणं आपलं काम आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत देखील माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या 34 वर्षा पासून आगरी युथ फोरम,डोंबिवली या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजत होत आहे. पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री,सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू ह.भ.प.चेतन महाराज म्हात्रे, जगन्नाथ महाराज म्हात्रे, प्रमुख उपस्थिती मध्ये बाळकृष्ण महाराज पाटील, जयेश महाराज भाग्यवंत, जनार्दन महाराज पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, गणेश महाराज ठाकूर, अनंता महाराज पाटील, बबन महाराज म्हात्रे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, कार्यकारी सदस्य शरद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, संतोष संते, जयेंद्र पाटील, सदस्य सदानंद म्हात्रे, भानुदास भोईर, कांता पाटील, विनायक पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पाटील, अशोक पाटील, प्रवीण पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments