पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत रविवार भारतासाठी शानदार ठरला. २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने भारताच्या पदकांचं खातं उघडलं. तिने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.या प्रकारात पहिल्या दोन क्रमांकावर दक्षिण कोरियाचे खेळाडू राहिले. ओ ये जिन हिने सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किम येजी हिने रौप्य पदक जिंकले.
Post a Comment
0 Comments