Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांमध्येच बंद दाराआड अनेक विषयांवर चर्चा 

               ब्लॅक अँड व्हाईट/मुंबई वृत्तसेवा 

विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.राज्यातल्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाली.दूध संकलन, कृषी आणि पाणी प्रश्न या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा संपल्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत काही प्रमुख अधिकारी देखील उपस्थित आहेत. या सर्व विषयांवरील चर्चा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांमध्येच बंद दाराआड आरक्षण या विषयवार चर्चा होणार आहे.

मराठा आरक्षणावर चर्चा

आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचंही आयोजन केलं होतं, पण या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. जवळपास दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीत आरक्षणाच्या प्रश्नावरून आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं शरद पवार म्हणाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं, आता शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे.

Post a Comment

0 Comments