निरंकारी भक्तांचे बदलापूरमध्ये 126 युनिट रक्तदान
तर बोरिवलीत 134 जणांनी केले रक्तदान
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
मानवसेवेचे ब्रिद जपत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी बदलापूर आणि बोरिवली अशा दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही या दोन्ही शिबिरांमध्ये निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे भाग घेऊन एकंदर 260 युनिट रक्तदान केले.
संत निरंकारी सत्संग भवन, गोराई, बोरिवली येथील रक्तदान शिबिरात 144 रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नांव नोंदणी केली व त्यापैकी 134 जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. संत निरंकारी सत्संग भवन, बदलापुर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण 126 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले ज्यामध्ये 103 पुरुष तर 23 महिला रक्तदात्यांचा समावेश होता.
बदलापुर येथील शिबिरामध्ये सर जे.जे.महानगर रक्तपेढी व संत निरंकारी रक्तपेढी द्वारे रक्त संकलनाचे कार्य पार पाडण्यात आले. बदलापुर येथील शिबिराचे उद्घाटन उल्हासनगरचे सेक्टर संयोजक किशन नेनवानी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या विविध शाखांचे प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. बदलापुर येथे मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.
बदलापुर येथील शिबिर तेथील स्थानिक मुखी माधवराव पोंदे यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आले. दोन्ही शिबिरांच्या यशस्वी आयोजनामध्ये स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
.jpg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments