९ आणि ४ वर्षांच्या चिमुरडींना लक्ष्य केल्याचा आरोप...
परिसरात संतापाचे वातावरण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुड्डू शेख आणि रामजीवन यादव या दोघांना अटक केली आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत गुड्डू शेख याने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या घटनेत रामजीवन यादव याने ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. लहान मुलींशी संबंधित या घटनांमुळे परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments