Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्वामी शांतिप्रकाश आश्रमातील राधेश्याम गौशाळेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी - छावा संघटना


             ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे 

 राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय छावा संघटनेने स्वामी शांतिप्रकाश आश्रमाच्या संचालनाधीन राधेश्याम गौशाळेत कथित भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि अव्यवस्था यांचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. 
  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल नामदेव गोळे पाटील यांनी खासदार डा. श्रीकांत शिंदे यांना निवेदन सादर करत मागणी केलीय की, गौशाळेच्या संचालनाबाबत सतत तक्रारी येत आहेत. तीन हजारांहून अधिक गोवंशाच्या चाऱ्याची, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांची उपेक्षा होत आहे. तसेच, चारा खरेदीत कथित झालेला गैरव्यवहार, निधीचा दुरुपयोग तसेच आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवेदनांतर्गत संघटनांनी,  सध्याच्या व्यवस्थापन समितीला बरखास्त करून गौशाळेत सरकारी प्रशासक नियुक्त करण्यात यावा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेचे बँक खाते, आर्थिक व्यवहार गोठवण्यात  यावेत, अशी मागणी केली आहे.
   संघटनेचे म्हणणे आहे की, दोषींवर कठोर कारवाई करून पारदर्शक व्यवस्था लागू केल्याशिवाय गोवंशाच्या संरक्षण आणि गौशाळेचे सुविधापुर्ण संचालन शक्य नाही. तसेच प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments