खाजगी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी बंद
आयएमएचे कल्याण अध्यक्ष डॉ.राजेश राजू
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर - नर्सेस मारहाणप्रकरणी निषेध म्हणून आयएमए कल्याणने आपत्कालीन कक्ष वगळता शहरातील सर्व खासगी डॉक्टरांच्या ओपीडी आणि आयपीडी सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज कल्याणातील खासगी डॉक्टरांच्या आयएमएसह केम्पा,निमा आदी संघटनांनी काम बंद आंदोलन केले. तर याबाबत सर्व डॉक्टरांची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ राजेश राजू यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीतील इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरला मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कल्याण डोंबिवलीतील सर्व खासगी डॉक्टर्सनीही बंद पुकारण्याचा इशारा दिला. या घटनेप्रकरणी आयएमए कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी आज बंद पुकारला होता.
.jpg)

Post a Comment
0 Comments