प्रेमसंबंधांना विरोध
स्कार्फने गळा आवळल्याचा आरोप, आरोपी आईला उल्हासनगर पोलिसांची अटक
ब्लॅक अँड व्हाईट | उल्हासनगर वार्ताहर
दुसऱ्या जातीतील युवकासोबतच्या प्रेमसंबंधांना विरोध करत एका आईने स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी आई आशा गरूड हिला अटक केली असून, घटनेमागील कारणांचा अधिक तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधांवरून घरात वारंवार वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला तिच्या आईचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून आई-मुलीमध्ये सातत्याने वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
रागाच्या भरात टोकाचे पाऊल
मंगळवारी रात्री घरातील हॉलमध्ये दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर संतापात झाल्यानंतर आरोपी आईने स्कार्फच्या साहाय्याने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती, तेव्हाच..
परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारी अमृता गरड हिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.अमृताच्या या प्रेमप्रकरणाला आई आशाचा विरोध होता.याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आई-मुलीमध्ये जोरदार वाद झाला.त्यावेळी घरात अमृताचे वडील आणि दोन भाऊ झोपलेले होते.वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना,रागाच्या भरात आई आशा गरड हिने दुपट्ट्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे
वडिलांच्या माहितीनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेनंतर घरात एकच खळबळ उडाली. मृत तरुणीच्या वडिलांनी तात्काळ उल्हासनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आईला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी घटनेला दुजोरा देत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments