Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वीरशैव लिंगायत समाजासाठी सांस्कृतिक भवन व रुद्रभूमीच्या जागेसाठी निवेदन

वीरशैव लिंगायत सेवा संस्थेची केडीएमसी स्थायी समिती सभापतींकडे मागणी
              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली परिसरातील वीरशैव लिंगायत समाजासाठी सांस्कृतिक भवन व उर्वरित भागांसाठी रुद्रभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वीरशैव लिंगायत सेवा संस्थेने केली असून याबाबत केडीएमसी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांना संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  
वीरशैव लिंगायत सेवा संस्था ही कल्याण-डोंबिवली परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यासाठी कार्यरत आहे. कल्याण (पश्चिम) येथे वीरशैव लिंगायत समाजासाठी रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या निर्णयामुळे समाजाची अनेक वर्षांची महत्त्वाची गरज पूर्ण झाली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात सुमारे २५ हजार लिंगायत समाजाची संख्या आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार मोठा असल्यामुळे डोंबिवली आणि कल्याण (पूर्व) येथील समाजबांधवांना अद्यापही अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कल्याण किंवा कल्याण-डोंबिवली परिसरात वीरशैव लिंगायत समाजासाठी 'वीरशैव सांस्कृतिक भवन' उभारण्यासाठी योग्य शासकीय, महानगरपालिकेची जागा उपलब्ध करून द्यावी.
 डोंबिवली परिसरात वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी (दफनभूमी) स्थापन करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. कल्याण (पूर्व) परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन तेथेही वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी (दफनभूमी) करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, समाजाच्या धार्मिक परंपरा, सांस्कृतिक जतन आणि नागरिकांच्या सोयीसाठी या सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे प्रशासन स्तरावर या मागण्यांचा सकारात्मक व तातडीने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 






Post a Comment

0 Comments