ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील १०० फूट रोड येथे पतंजली योग ग्रुप व अंबिका कुटीर योग, ध्यान साधना योग ग्रुप कल्याण यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक आमदार सुलभा गायकवाड, जिल्हा सचिव संजय गायकवाड तसेच जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी, सुभाष मस्के, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, पांडुरंग भोसले, नगरसेविका मनीषा गायकवाड, स्नेहल मोरे, इंदिरा तरे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा यशोदा माळी तसेच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवनासाठी योगाचा नियमित सराव प्रत्येकाने करावा, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
.jpg)









Post a Comment
0 Comments