Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एस एस टिचे ९ खेळाडु चमकणार "खेलो इंडियात" !


मुंबई विद्यापीठाच्या रग्बीत दुहेरी कांस्यपदक

             ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, (प्रफुल केदारे

एस.एस.टी. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई विद्यापीठाच्या पुरुष आणि महिला रग्बी संघांना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले.  या यशामुळे दोन्ही संघांनी आता प्रतिष्ठित खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस विद्यापीठात ही स्पर्धा पार पडली. भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील ६१ महिला आणि ६२ पुरुष संघांनी सहभाग घेतला होता.

मुंबई विद्यापीठाच्या पुरुष संघात एस.एस.टी. महाविद्यालयाचे निशांत चौहान, सुमित चौहान, अनिकेत केवने, शिवप्रसाद शर्मा, गणेश उपाध्याय आणि निखिल चौहान यांनी सहभाग नोंदवला. तसेच महिला संघात सपना यादव, तृप्ती भोईर आणि सुरूर रजक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघ व्यवस्थापक म्हणून पुष्कर पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर विशेष मार्गदर्शन क्रिडा विभाग संचालक प्रा. राहुल अकुल यांनी केले होते.

विशेष म्हणजे, या अखिल भारतीय स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयाचे एकूण ९ खेळाडू सहभागी झाले होते, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments