म्हाडाच्या सर्व्हेला करणार विरोध
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील समस्यांचे शुल्ककाष्ट संपताना दिसत नाही. प्रदूषण, कचरा आणि पाण्याची समस्या मोठी असताना त्यातच म्हाडाचे मोठे प्रकल्प गुचरण जागेत येऊ लागल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 14 गावातील उत्तरशिव गावातील म्हाडाच्या सर्वेला गावकरी आणि भूमिपुत्रांचा विरोध असून उत्तरशिव गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन म्हाडाच्या प्रकल्पाला 14 गावातील ग्रामस्थांचा विरोध कायम असणार असल्याचे सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी सतत्प प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गावकरांच्या या निर्णयाला 14 गावच्या समिती सदस्यांनी, राष्ट्रवादी पदाधिकारी आणि अपक्ष नगरसेवक यांनी पाठींबा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष आणि 14 गाव समिती सदस्य जीवन वालीलकर यांनी सांगितले की आम्ही ग्रामस्थांसोबत 100% आहोत, ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका रास्त आहे. ही लढाई आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण 14 गावांमध्ये म्हाडा सारखा प्रकल्प पाच वर्षांपासून राबवत आहेत आणि 14 गावचे संपूर्ण गुरुचरण ही म्हाडा घेण्याच्या तयारीत आहे.
या विषयासंदर्भात माजी आमदार राजू पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली होती. या बैठकीला 14 गावातील सर्व ग्रामस्थ देखील उपस्थित होते आणि नगरसेवक बाबाजी पाटील सुद्धा होते. आम्ही यावेळी म्हाडाला जागा देऊ नये म्हणून विरोध केला होता आणि सर्वे रद्द करण्यात आला होता. परंतु आता हा विषय कुठून आला? कसा पास झाला ? या संदर्भात सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या विषयात 14 गाव सर्व पक्ष विकास समितीने लक्ष घातलं पाहिजे असे जीवन वालीलकर यांनी सांगितले.
14 गावांमध्ये आधीच मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते पाणी अशा अनेक अडचणी आहेत. म्हाडाच्या प्रकल्पामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे येथे गर्दी होऊ शकते आणि मूलभूत सुविधांवर ताण येऊ शकतो. ही गोष्ट स्थानिक आमदार राजेश मोरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष घातले पाहिजे. खासदारांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन किंवा पत्र देऊन जमिनी 14 गावांच्या विकासासाठी आरक्षित कराव्यात. याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे वालिलकर यांनी सांगितले. दरम्यान आता प्रशासन, म्हाडा आणि लोकप्रतिनिधी यावर निर्णय घेतात हें पहावे लागेल.
ग्रामस्थ ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलावतील त्या वेळेला आंदोलन करायची आणि उपोषण करण्याची सुद्धा तयारी आहे. ग्रामस्थांच्या 24 तास आम्ही सोबत आहोत. ग्रामस्थांचा विरोध असेल तर आम्ही देखील शासन दरबारी विरोध करू आणि मोजणी करू देणार नाही. जेवढी जागा त्यांनी घेतली तेवढी ठीक आहे, परंतू आता याच्यापुढे नवी मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही विरोध करणार असल्याचे अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments