ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
“रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको.’ बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या या दिव्य उद्घोषाला जीवनाचे अंग बनवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी कळवा व तळोजा येथे आयोजित दोन रक्तदान शिबिरांमध्ये 366 युनिट रक्तदान करण्यात आले.
संत निरंकारी सत्संग भवन, कळवा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदानासाठी सुमारे 370 निरंकारी भक्तांनी आपली नांवे नोंदवली होती त्यापैकी 259 रक्तदात्यांना रक्तदानाद्वारे मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान देण्याची संधी मिळाली. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांनी रक्त संकलन केले. या शिबिराचा शुभारंभ संत निरंकारी मंडळाचे ज्ञान प्रचारक बाबुभाई पांचाळ यांच्या उपस्थितिमध्ये निरंकार प्रभुच्या प्रति प्रार्थनेने करण्यात आला. या प्रसंगी मिशनच्या विविध शाखांचे प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.

या शिबिराला शिष्टाचार करणाऱ्या मान्यवरांमध्ये ठाण्याचे उप महापौर कृष्णा पाटील, नगरसेवक मिलिंद पाटील, महेश साळवी, अपर्णा साळवी, मंदार केणी, विजया लासे, माजी नगरसेवक राजेंद्र सापते तसेच सामाजिक कार्यकर्ता सुशांत सूर्यराव यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी निष्काम सामाजिक सेवांचे कौतुक केले. स्थानिक मुखी कांतिराम सेमवाल यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहकार्याने या शिबिराचे अत्यंत सुंदर प्रकारे आयोजन केले.
त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशनच्या नावडा ब्रांचच्या वतीने बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजियोथेरपी, तळोजा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 107 रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या शिबिरात तळोजा, नागाव, नावडा व कोलवाडी भागातील निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. या शिवाय समाजातील अन्य रक्तदात्यांनीही या शिबिरामध्ये भाग घेतला.
.jpg)

Post a Comment
0 Comments