ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
योगीधाम, भवानी चौक, अनुपम नगर आदी प्रभागातील नागरिकांना होत असलेल्या प्रदूषणाच्या त्रासाच्या अनुषंगाने शिवसेना विभाग प्रमुख सतीश वायचळ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी केली. यावेळी वालधुणी नदी पात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून परिसरातील हवेची गुणवत्ता देखील तपासण्या साठी गुणवत्ता तपासणारी गाडी लावण्यात आली आहे. संबंधित तपासणीनंतर लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या पाहणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, शाखा प्रमुख विशांत कांबळे, उपविभाग प्रमुख सुरेंद्र परब, नितीन सावंत, सूरज पाटकर, गिरीश पाटील, विभाग प्रमुख सतीश वायचळ तसेच शिवसेना भवानी चौक शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments