Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवलीत सुरू असलेला आठवडी बाजार बंद करण्याची मागणी

कल्याण डोंबिवलीत सुरू असलेला आठवडी बाजार बंद करण्याची मागणी डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या वतीने डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी महापालिकेच्या प्रशासनावर आरोप करीत सदरील आठवडे बाजार बंद करण्याची मागणी करीत फेरीवाला धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

 पथविक्रेता अधिनियम 2014 नुसार कोणतेही फेरीवाला क्षेत्र घोषित न करता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आठवडा बाजार भरविला जात असल्याचे सांगून स्थानिक व भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या फळ,भाजीपाला विक्रीवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे.पथ विक्रेता अधिनियम2014 नुसार फेरीवाल्यांचे पुर्नसर्वेक्षण करून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

पालिकेच्या क्षेत्रातील मोठ मोठ्या गृहसंकुलातील बेकायदेशीर आठवडी बाजार बंद करण्यात यावा,सदर आठवडी बाजारातून पालिकेला कोणताही महसूल मिळत नसल्याचे सांगून ,आयुक्तांनी सदर प्रकरणी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments