Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दिव्यांग विद्यार्थ्यांना केडीएमसीतर्फे साहित्याचे वाटप

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये ९९९ दिव्यांग विदयार्थी असून समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शोध पत्रिकेद्वारे ० ते १८ वयोगटातील दिव्यांग मुलांचा शोध घेवून या मुलांची तसेच शालेय दिव्यांग विदयार्थ्यांची माहे जून-जुलै महिन्यांमध्ये आरोग्य तपासणी/मोजमाप तपासणीकरिता शिबीराचे आयोजन केले जात

या तपासणी शिबीरामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी संदर्भित केलेल्या विदयार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय सुविधा, साहित्य/साधने/उपकरणे पुरविले जातात. त्यानुसार बुधवारी कल्याण मधील अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल येथे ८१ दिव्यांग विदयार्थ्यांना (अस्थीव्यंग/सेलेब्रल पाल्सी/ऑटीझम, कर्णदोष व लो-व्हीजन प्रवर्गातील) मोफत शैक्षणिक साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले.

यावेळी शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, सदस्य जतिन प्रजापती, श्यामल गायकर, प्रतिक पेणकर,  सदस्या कविता म्हात्रे, अपर्णा भोईर, रसिका पाटील, शालिनी वायले, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे व शिक्षणाधिकारी विजय सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते. वितरण करण्यात आलेल्या साहित्य, साधनांचा दिव्यांग विदयार्थ्यांना उपयोग होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सभापती अभिजित थरवळ यांनी या दिव्यांग विदयार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होवून येणा-या काळात हे विदयार्थी त्यांचे भविष्य नक्कीच उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला. 




 

Post a Comment

0 Comments