ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर
बदलापूर मधील व्यावसायिक श्री गोपीचंद जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह ग्रेटधारा उद्योग समूहच्या माध्यमातून विविध प्रकारचे ग्राहक पेठ,प्रदर्शन व विक्री यासारखे अनेक लहान मोठे उपक्रम राबवित असतात. त्याच अनुषंगाने ग्रेटधारा फाउंडेशन च्या माध्यमातून व्यवसाया सोबत समाजकार्य ही करीत असतात.अतिशय कष्टाने जाधव दांपत्याने आपला व्यवसाय नावारूपाला आणला.असे असतांना समाजमाध्यमातून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात व्यावसायिक विरोधकांकडून गोपीचंद जाधव यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा खोटा आरोप केला आहे.अशा निरर्थक आरोपामुळे जाधव कुटुंबावर अत्यंत मानसिक आघात झाला आहे.विरोधकांकडून खोटा AI व्हिडिओ बनवून जाधव कुटुंबाची नाहक बदनामी घडवून आणली आहे.अशा खोट्या आरोपामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगत त्यांनी हया प्रकरणी बदलापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून,लवकरच संबंधित व्यक्तीवर मानसिक छळ करण्याचा गुन्हा दाखल करून, मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
![]() |
| श्री.गोपीचंद जाधव |
संबंधित प्रकरणी माहिती अशी की,गोपीनाथ जाधव,यांचे आणखी एक व्यावसायिक सहकारी, श्री. रमण सावंत यांचे एका व्यावसायिकाशी (नवाब गुल खान उर्फ नूर)काही आर्थिक व्यवहार होते,त्यातून उपरोक्त व्यक्तीशी सावंत यांनी आर्थिक व्यवहार केले आहे त्यांना सावंत यांच्याकडून काही रक्कम येणे बाकी असल्याचे दिसून आले.त्यातून संबंधित व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या (नवाब गुल खान उर्फ नूर) व्यावसायिकाने सावंत यांच्यावर आर्थिक व्यवहारात घोटाळा केल्याचे आरोप करतांना त्यांनी,श्री गोपीनाथ जाधव यांच्यावरही आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला. वास्तविक गोपीनाथ जाधव यांचे कोणतेही व्यवहार संबंधित व्यक्तीशी कधीच झाले नाही,इतकेच नाही तर खोटा व्हिडिओ बनवून जाधव कुटुंबाची नाहक बदनामी करणाऱ्या व्यक्तीला जाधव हे ओळखतही नाही असे सांगितले आहे.
![]() |
| श्री. रमण सावंत |
ह्याच अनुषंगाने श्री रमण सावंत याच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपली बाजू स्पष्ट करीत,सांगितले की,"माझ्या आर्थिक व्यवहाराशी श्री गोपीचंद जाधव यांचा कोणताही संबंध नाही.तरीही जाधव यांच्या विषयी बदनामीकारक माहिती प्रसारित केली जात आहे".
असे असतांना समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओ मुळे नाहक बदनामी घडवून आणली जात आहे.त्यामुळे आता कायदेशीर मार्गाने संबंधित व्यक्तीला धडा शिकविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments