Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वाढत्या वाहनचोरींवर कोळसेवाडी पोलिसांचा मोठा प्रहार

 

१० मोटारसायकली जप्त 
एक आरोपी अटकेत

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कोळसेवाडी परिसरात सातत्याने वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून संपूर्ण चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १० मोटारसायकली जप्त करत टोळीच्या कारवायांना मोठा धक्का दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वाढत्या बाईक चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डीसीपी अतुल झेंडे व एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता.
 या तपासादरम्यान ३ एप्रिल रोजी खबऱ्याकडून माहिती मिळाली की विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ काही तरुण संशयास्पद पद्धतीने उभ्या वाहनांची रेकी करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून शुभम उर्फ शिवम संपत पथारे (२४) याला अटक केली. त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

आरोपीकडून एक चोरीचा स्कूटर जप्त करण्यात आला असून पुढील चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. आरोपी विविध भागांतून मोटारसायकली चोरी करून त्या लपवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या दाखल्यावरून एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे ३.५५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांच्या मते, ही कारवाई वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

मोटारसायकल चोरीचे एकुण ८ गुन्हे उघड करण्यात आले असून या  गुन्हयाचा तपास पोलीस हवा दत्तु जाधव हे करत आहेत. तर हि कामगिरी  पोलीस उप आयुक्त  अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त  कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप भालेराव, पोलीस उप निरी जगन सापटे, पोहवा कापडी, बोरसे, सांगळे, सौंदाणे,  वाघ, घुगे, आव्हाड,  जाधव, बुधवंत, पोना फटांगरे,  कोती, पोशि इंगळे, खरे,  सोनावळे,  गिते यांनी केलेली आहे.


Post a Comment

0 Comments