मुंबई महानगर क्षेत्रात एकूण 1055 युनिट रक्त संकलित
करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाचा प्रेरणादायी उत्सव – मानव एकता दिवस
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
संत निरंकारी मिशनच्या वतीने मानव एकता दिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगर क्षेत्रात आयोजित 4 रक्तदान शिबिरात तब्बल 1055 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. यामध्ये डोंबिवली व भिवंडी येथे एकूण 490 निरंकारी भक्तांचा समावेश होता. तर चेंबूर येथे 220 आणि नालासोपारा येथे 345 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले.
संत निरंकारी मिशनतर्फे ‘मानव एकता दिवस’ निमित्त डोंबिवली व भिवंडी येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरांत एकूण ४९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. डोंबिवली येथे २१७ युनिट तर भिवंडी येथे २७३ युनिट रक्त संकलित करण्यात आले. जे. जे. महानगर रक्तपेढी व संत निरंकारी रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.
संत निरंकारी मिशनच्या नारिंगी सेक्टरतर्फे संत निरंकारी सत्संग भवन, नालासोपारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवेच्या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ३४५ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. तर संत निरंकारी मिशनच्या चेंबूर शाखेद्वारे संत निरंकारी सत्संग भवन,चेंबूर येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे २२० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन संत निरंकारी रक्तपेढीद्वारे करण्यात आले.
देशभरातील सुमारे २०० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जवळपास ४०,००० युनिट रक्त संकलित करण्यात आले, जे निष्काम सेवा, परोपकार आणि मानवतेप्रती असलेल्या समर्पणाची प्रभावी अभिव्यक्ती ठरले.
मानव एकता दिवस’चा मुख्य कार्यक्रम 24 एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या सान्निध्यात, दिल्लीतील ग्राउंड क्र. ८ येथे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवरही हा दिवस श्रद्धा व समर्पणभावाने यशस्वीरीत्या पार पडला.
मुंबई महानगर प्रदेशांमध्ये सुमारे 40 ठिकाणी मनवेकता दिवस निमित्ताने विषय सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले. हे केवळ एक आयोजन नव्हते, तर प्रेम, सद्भावना आणि निष्काम सेवेचे प्रभावी प्रतिबिंब म्हणून ते सर्वत्र उमटले.
.jpg)




Post a Comment
0 Comments