ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एका २२ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. टिळकनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३ रिक्षा चालकांना अटक केली आहे. सोलापूरची राहणारी एक महिला डोंबिवलीत सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करते. तिच्या ओळखीच्या रिक्षा चालक मित्रांनी तिला पार्टीसाठी खंबाळपाडा येथील एका घरात घेऊन गेले आणि पार्टी करून एकाने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण करत अत्याचार केला. तिच्या सोबत झालेल्या या घटनेची तक्रार पिडीत महिलेने टिळकगनर पोलिस ठाण्यात दिली.
टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम आणि त्याच्या टीमने त्वरीत गुन्हा दाखल करुन तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे. उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण अशी आरोपीची नावे असून हे तिघे जण डोंबिवलीत रिक्षा चालवितात आणि यातील मुख्य आरोपी उमेश आहे असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments