Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्याहस्ते वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन आज कल्याणात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वैष्णवी रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.


कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.



डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments