Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा स्लॅब कोसळला एकजण ठार

 

                    ब्लॅक अँड व्हाईट मुंबई प्रतिनिधी 

आज मुलुंड पश्चिम येथील अग्निशमन दलाजवळ, (एल.बी.एस. मार्ग) येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी परापेट/साइड वॉल कोसळल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्रे स्पष्टपणे दर्शवितात की संबंधित संरचना अचानक कोसळली आहे.

ही घटना केवळ “अपघात” म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. हा प्रकार निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचे काम, सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन किंवा देखरेखीतील गंभीर त्रुटी यांपैकी कोणत्या कारणामुळे घडला, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

यासंदर्भात खालील मुद्द्यांवर तात्काळ स्पष्टीकरण अपेक्षित आहे —

 सदर घटनेबाबत जबाबदार कंत्राटदार, अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार का?

 या घटनेत नागरिकांच्या जीवितास किंवा मालमत्तेला हानी झाली असल्यास त्याची नुकसानभरपाई कोण देणार?

 सुरक्षाविषयक मानके (Safety Audit, Structural Stability Certificate, Site Supervision Reports) नियमितपणे तपासली जातात का?

 भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती ठोस व लेखी हमी देण्यात येणार आहे?

एल.बी.एस. मार्गावरील मेट्रोचे काम मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आदी भागांत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व भागांमध्ये दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. अशा परिस्थितीत जर बांधकाम स्थळी सुरक्षेची हमीच नसेल, तर हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.

मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक निधीतून उभारला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. संबंधित विभागाने तात्काळ स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी व सार्वजनिकरित्या अहवाल प्रसिद्ध करावा.

नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारी कोणतीही निष्काळजीपणा माफ केला जाणार नाही.

सुरक्षितता ही पर्याय नसून अनिवार्य जबाबदारी आहे.अशा भोंगळ, निष्काळजी कारभारामुळे मेट्रो आणखीन किती नाहक बळी घेणार?याला जबाबदार कोण,,,

Post a Comment

0 Comments