Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची १०१३ जणांवर कारवाई

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ ३  अंतर्गत दामिनी पथकाने  विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त  अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण- डोंबिवली शहरात विशेषतः शाळा-कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, व्यसनाधीन हालचाली आणि शांतता भंग करणाऱ्या १०१३ व्यक्तींवर दामिनी पथकाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.


पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत कल्याण व डोंबिवली शहरातंर्गत सार्वजनिक गर्दीची व रहदारीची ठिकाणे, मॉल, उदयान, बागबगीचा, निर्जन ठिकाणे, शाळा, कॉलेज या ठिकाणी शाळकरी विदयार्थिनी, नोकरीस असलेल्या महिला यांची सुरक्षा व व्हॅलेटाईन दिनानिमित्त मुलीना त्रास देणे, छेडछाड करणे यासारख्या गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी दामिनी पथक परिमंडळ ३ कल्याण यांचेकडून विशेष सुरक्षा कारवाई मोहीम आखण्यात आली होती.



त्याअनुषंगाने दामिनी पथक परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत शाळा व कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड करणे, शाळा परिसरात व्यसन करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे, आराडाओरड करून शांतता भंग करून इतरांना त्रास देणे, यासारख्या गुन्हयांना वेळीच प्रतिबंध करून महिला सुरक्षा कारवाई करण्यात आलेली आहे.

 विदयार्थी तसेच महिला यांचे सुरक्षेसाठी अशा गुन्हयाची माहिती मिळाल्यास पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण पोलीसांशी डायल ११२ नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  तसेच यापुढेही कल्याण व डोबिवली शहरात दामिनी पथकाकडून अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments