Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये हळदी कुंकू व बोरन्हाण समारंभ

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

  प्राथमिक विद्यामंदिर  कर्णिक रोड या शाळेत आज संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व लहान मुलांचे बोरन्हाण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सौं वेद पाठक मॅडम व सौ साबळे मॅडम यांनी सरस्वतीचे पूजन केले व त्यानंतर हळदीकुंकू समारंभास सुरुवात झाली.

 सुरुवातीला पूर्व प्राथमिक शाळेतील लहान मुलांचे बोरन्हाण करण्यात आले व त्यामागील हेतू पालकांना सांगण्यात आला एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे संक्रांत ते रथसप्तमी या काळात बोरन्हाण करण्यात येते. बाळाच्या आरोग्य दीर्घायुष्य व समृद्धीसाठी तसेच नकारात्मक शक्तीपासून संरक्षणासाठी बोरन्हाण केले जाते यानिमित्ताने लहान मुलांचे अगोदर औक्षण केले व त्यानंतर मुलांच्या डोक्यावर बोरे ऊस तिळगुळ शेंगदाणे मुरमुरे साखर फुटाणे, गोळ्या बिस्किटे व चॉकलेट इत्यादी पदार्थ टाकले या कार्यक्रमासाठी लहान मुले छान काळ्या रंगाचे कपडे घालून व तिळगुळाचे दागिने घालून आली होती त्यानंतर सर्व महिलांना हळदीकुंकू फुल  तिळगुळ व संक्रांतीचे वाण देण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व महिला शिक्षक व महिला पालकांनी शाळेला सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments