Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीच्या खवय्यांसाठी दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी

 

               ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.विविध जाती धर्माचे लोकं इथे आनंदाने राहतात. सुशिक्षीत नागरिकांचे शहर, टीव्ही,सिनेमा कलाकारांचे शहर,साहित्यिकांचे शहर अशी ख्याती असलेल्या शहरात खाद्य संस्कृतीही तितकीच विविधतेने नटलेली आहे.खवय्यांचे लाड पुरवण्या साठी ह्या शहरात अनेक प्रकारचे ठिकाणं आहेत.त्यातच आता नवीन भर पडली ती एका साऊथ कॅफेची.दक्षिण भारतीय पदार्थ तसे इथे नवीन नाही,परंतु
दक्षिण भारतात अनेक  शहरांत नावाजलेले आणि खाद्यपदार्थांची विशिष्ट ओळख असलेले नाव म्हणजे  तीर्थम साऊथ कॅफे.


ह्याच कॅफेची नवीन शाखा डोंबिवलीतील खाद्यप्रेमींसाठी  उदयास आली आहे. दक्षिण भारतीय पाककृतींच्या समृद्ध परंपरेचा एक अनोखा आस्वाद देणारे, "तीर्थम - द साउथ कॅफे" डोंबिवली पूर्वेमध्ये भव्यदिव्यपणे उद्घाटन करण्यात आले.



घारडा सर्कलजवळ स्थित, हे कॅफे एकाच छताखाली   पारंपारिक दक्षिण भारतीय पदार्थांची नाविन्यपूर्ण पाककृती देते. मेनूमध्ये डोसा, इडली, वडा, उत्तपम, पोंगल आणि फिल्टर कॉफी सारखे लोकप्रिय पदार्थ आहेत, जे ग्राहकांच्या चवीला आनंद देतील.



उद्घाटन समारंभाचे संचालन संकेत चव्हाण यांनी केले. याप्रसंगी हॉटेल मालक चरण शेट्टी, हॉटेल कर्मचारी, किशोर घाग, डॉ. योगेश सरोदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या दिवसापासूनच स्थानिक रहिवाशांमध्ये या कॅफेबद्दल खूप उत्सुकता आहे आणि अशी अपेक्षा आहे की “तीर्थम – द साउथ कॅफे” लवकरच डोंबिवलीतील खाद्यप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरेल यात शंका नाही.





Post a Comment

0 Comments