ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पक्ष फोडाफोडीवरून शिवसेनेने पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर केलेल्या टीकेला भाजपकडूनही तितकेच जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नसून तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ, ही शांत बसणारी भाजपा नाहीये अशा शब्दांत भाजपकडून शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपाचे संदीप माळी, मितेश पेणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत आम्ही त्याचे पालन करत आलो होतो मात्र आधी उल्हासनगर आणि नंतर मग अंबरनाथमध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन त्यांनीच त्याचे उल्लंघन केल्याचेही परब यांनी स्पष्ट केले. त्यावर मग आम्ही खासदार साहेबांचा निषेध करायचा का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून आम्ही पहिली चूक, दुसरीही चूक माफ केली. मात्र तिसऱ्या चुकीला माफी नाही असा इशारा वजा सल्ला देत आम्ही मैत्रीत पहिला घाव करत नाही, पण आता हातावर हात ठेवून शांत बसणारी भाजप राहिलेली नाही. तुम्ही दगड मारला तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला.
दरम्यान आजच्या पक्ष प्रवेशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्याला फोन करत आजच्या प्रवेशाबाबत विचारणा केल्याचे सांगत यापुढील पक्षप्रवेश आपल्याला विचारूनच करण्याचे निर्देशही दिल्याचे नंदू परब यांनी सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments