ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी उल्हासनगर येथे Rhythm Dance Classes आयोजित Rhythm Resurgence , The Annual Dance Competition मध्ये समूह नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मानेरे केंद्र भाल ता. अंबरनाथ येथील मुलींनी पारंपरिक दिंडी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी परिसरातील विविध शाळा, खाजगी क्लासेस मधील ३५ पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होते.
मार्गदर्शन शाळेच्या शिक्षिका श्रीम. चंदाराणी कुसेकर आणि श्रीम. अरुणा कांबळे यांनी केले असले तरी जिल्हा परिषद शाळेच्या या मुलींची तयारी आणि सराव करून घेण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थीनी कु. प्राची लोखंडे आणि कु. नेहा भोईर यांनी विशेष मेहनत घेतली. या समूह नृत्यामध्ये शिवन्या गाडे, मान्यता जोशी, मनाली जोशी, हिमानी म्हात्रे, माही फुलोरे, यामिनी फुलोरे, निशिका भोईर, रुईका भोईर, लावण्या लोखंडे, धैर्या भोईर, भूमिका भोईर, देविका भोईर, जिज्ञासा जोशी, तानिया पाटील या इयत्ता पहिली पासून सातवी पर्यंतच्या एकूण चौदा मुलींनी सहभाग घेतला. या चिमुकल्यांचे आयोजक नृत्य दिग्दर्शक आकांक्षा गाडेकर आणि परीक्षक यांच्यासह उपस्थित प्रेक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. केंद्र स्तरीय समूहनृत्य स्पर्धेत मात्र याच नृत्याला दुसरा क्रमांक देण्यात आला याबद्दल पालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments