ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने रोजी आयोजित करण्यात आलेल्या अखंड वाचनयज्ञ उपक्रमांमध्ये ज्ञानदा वाचनालय कवी कट्टा व आगरी साईत्य शालातर्फे ना. धो. महानोर काव्यवाचन सत्रात शनिवारी बालक मंदिर संस्था कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते.
ना. धो. महानोर काव्यवाचन सत्रासाठी सार्वजनिक वाचनालय, कल्याण येथील स.ग्रंथपाल करुणा कल्याणकर, ग्रंथसंपदा वाचनालय संस्थापिका संपदा दळवी व काव्यकिरण मंडळ कार्याध्यक्षा स्वाती नातू, डॉ. शैलजा करोडे याप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राचे संयोजन कवयित्री व लेखिका आश्विनी म्हात्रे यांनी केले. आगरी साईत्य शाला समूहाचे प्रशासक जयंत पाटील, साहित्यिक पुंडलिक म्हात्रे, अनंत भोईर, विनोद कोळी, नितुराज पाटील, राजेंद्र पाटील, माधव गुरव, गिरीश म्हात्रे, वासुदेव फडके, चंद्रकांत पाटील, जयराम कराळे, संस्कृती म्हात्रे, अनन्या म्हात्रे यांनी आगरी बोलीतील कविता सादर केल्या.तर इतर कवींनी देखील प्रमाण मराठीत निसर्ग कविता व हिंदी कवितांचे सादरीकरण केले. निसर्ग कवितेला बोली भाषेची साद देत विठ्ठलाच्या भक्तीमय वातावरणात सलग 36 तास आणि एकत्रीत 300 तासांच्या अखंड वाचन यज्ञात आगरी बोली भाषेचा जागर झालाच प्रमाण मराठी व हिन्दी भाषेचाही जागर केला.
.jpg)

Post a Comment
0 Comments