ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी रेल चाइल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक शाळा डोंबिवली पश्चिम या शाळेला सदिच्छा भेट दिली.
शाळेचे मुख्याध्यापक अजय कुमार जोगी यांनी माननीय प्रशासनाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत करून शाळेविषयी माहिती दिली. प्रशासन अधिकाऱ्यांनी यावेळी थेट विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधला. निपुण भारत अभियान अंतर्गत झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गणितातील उदाहरणे सोडवण्यास दिली. त्यातून विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रगतीची दखल घेतली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकली.
त्यानंतर प्रशासनाधिकारी यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधत ते महात्मा गांधी शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी रेल चाइल्ड संस्थेचे अध्यक्ष उल्हास झोपे, शाळा समिती सदस्य महाजन, नितीन मांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वास भोईर, सीआरसी प्रमुख गुप्ता, शाळेचे मुख्याध्यापक अजय कुमार जोगी आणि दोन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)





Post a Comment
0 Comments