भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.दिनानाथ पाटील यांची "राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटक संच विकसन कार्यशाळेकरिता" राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ म्हणून निवड
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र राज्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणेने व्यसनमुक्तीबाबत घटकसंच निर्मिती व वाचन साहित्य विकसित करण्याच्या दृष्टिने पाऊले उचलले असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आदेश जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/व्य.मु./२०२५/नुसार, दिनांक-२०/०९/२०२५च्या आदेशान्वये राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन कार्यशाळेसाठी राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून ठाणे जिल्ह्यातून भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहा. शिक्षक डॉ. दिनानाथ मुरलीधर पाटील यांची निवड करण्यात आली असून ते आपल्या या क्षेत्रातील अनुभव याकामी देणार आहेत.
सध्याच्या काळात व्यसन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदयार्थी आणि युवकांतील या वाढत्या व्यसनाच्या सवयीमुळे आरोग्य, कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांचा समावेश करण्याबाबत सूचित केलेले आहे. तद्नुषंगाने विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती या विषयाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधनात प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन निर्मिती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटक संच विकसन निर्मितीसाठी पहिली कार्यशाळा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती.
या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे चे सन्माननीय संचालक मा. राहुलजी रेखावार (भाप्रसे) व उपसंचालिका मा. डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक मा. अरुण जाधव सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग, तसेच अधिव्याख्याता श्रीमती. शितल शिंदे
श्री. बाळासाहेब गायकवाड, यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. डॉ.दिनानाथ पाटील यांच्या या अभिनंदनीय निवडीचे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश भावसार व सहकारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments