Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीचा स्वच्छोत्सव - स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र शासनाच्या "स्वच्छता ही सेवा-स्वच्छोत्सव २०२५ " अभियान अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर  या कालावधीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये "स्वच्छता ही सेवा पंधरवाडा" साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून आज गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेमार्फत "एक दिन एक तास एक साथ" मोहिम अंतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आलेली आहे.


या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध १० ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होवून सक्रिय श्रमदान केले असून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मुख्यालय स्तरावरुन या विशेष मोहिमेचा मुख्य कार्यक्रम कल्याण पश्चिम परिसरातील गणेश घाट, दुर्गाडी चौक येथे पार पडला.



हि मोहिम महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडली असून मोहिमेस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, क प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, मुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टीन घुटे यांच्यासह विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अध्यक्ष जयवंत विश्वास यांच्यासह महापालिकेच्या मुख्यालय तसेच ब व क प्रभागातील सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी तसेच विद्युत विभागातील कर्मचारी हे सहभागी होते.

 या मोहिमेस इंडियन रेडीओलॉजी असोशीएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाच्या एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच इतर नागरीक यांचे मोलाचे योगदान लाभले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरामध्ये आयोजित "एक दिन एक तास एक साथ या उपक्रमांतर्गत सुमारे ६४ मे. टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले असून हा कचरा पुढील प्रक्रियेकरीता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी पाठविण्यात आला.


मोहिमेच्या प्रसंगी उपस्थितांमार्फत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली असून "आपले शहर स्वच्छ ठेवणेकरीता नागरीकांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करुन त्यांचेकडे निर्माण होणारा कचरा उघडयावर न फेकता ओला व सुका याप्रमाणे वर्गीकरण करुन महापालिकेच्या घंटागाडीमध्ये देण्यात यावा तसेच "एक दिन एक तास एक साथ मोहिमेस व्यापक स्वरुप देणेकरीता नागरीक तसेच महापालिका प्रशासन यांनी एकत्रित योगदान देणे गरजेचे आहे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.


Post a Comment

0 Comments