मोफत आरोग्य शिबीर, वह्या वाटप,छत्री
वाटपाचे आयोजन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिम बेतुरकरपाडा प्रभागातील माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ५० महिला उद्योजकांना अद्यावत पाणी पुरी गाडीचे लोकार्पण करण्यात आले. तर बेतुरकर पाडा परिसरातील नागरिकांसाठी सकाळी जिजाऊ संघटनेवतीने मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीर तसेच मोफत चष्मे व औषधे गोळ्या वाटप करण्यात आल्या. परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला. शालेय विद्यार्थ्यांना वह्या व जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून महिलांसाठी पाणी पुरी मशीन उपक्रम आणला असून त्याचा शुभारंभही करण्यात आला.
यावेळी सत्कारमुर्ती माजी नगरसेवक अरविंद पोटे यांना शुभेच्छा देतांना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, कल्याण पश्चिम भागातील पोटे कुटुंब नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात. अरविंद पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच महत्वाचे म्हणजे महिलांना व्यवसाय करण्यासाठी पाणीपुरी उपक्रम सुरू केला आहे. समाजाच्या आपण उपयोगी पडलो पाहिजे. समाजाला काय पाहिजे हे बघितले पाहिजे आज एवढी गर्दी बघून पोटे दांम्पत्याने केलेले सामाजिक काम दिसत आहे असे सांगितले.
शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांनी सांगितले की महाराष्ट्र उद्योजकता केंद्र व जीजामाता बचत गट यांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली परिसरातील पन्नास मराठी महिला उद्योजक बनण्यासाठी पाणी पुरी मशीन देण्यात येणार आहेत. आज एक मशीनचा शुभारंभ केला आहे. मराठी महिला उद्योजक होऊन सक्षम झाली पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश आहे असे सांगितले.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख रवि पाटील, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, जिजाऊ संघटनेचे कल्याण शहर अध्यक्ष गणेश कारके, ज्येष्ठ नागरिक सुरेश बागुल, नमिता शाहू, मंदाकिनी गरूड, रंजना माने, मोहिनी गावकर, विद्या चौधरी, कल्पना तांबे, मालती शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments