Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

योगीधाम मध्ये संघर्ष मित्र मंडळाचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा


               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

संघर्ष मित्र मंडळ व महिला मंडळ आयोजित नवरात्री उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येत आहे. ह्या नवरात्री उत्सवात रस गरबा खेळणाऱ्याला दररोज आकर्षक बक्षिसांची भेट देण्यात येत असते.

संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष सुजित अनंत जाधव, सौ. निकिता सुजित जाधव, यांच्या माध्यमातून योगीधाम परिसरात  दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो.त्याच अनुषंगाने या वर्षीही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे.दररोज परिसरातील समस्त महिलावर्ग यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.मंडळाकडून दररोज आकर्षक बक्षिसांचे वाटप करून रास गरबा खेळणाऱ्याला प्रोत्साहित केले जाते.ह्या उपक्रमामुळे परिसरातील समस्त महिलावर्ग भक्तिभावाने रास गरब्याचा आनंद घेत असतात.





दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या उत्सवासाठी मंडळाचे कार्यकर्तेसुनील गांगुर्डे (मामा) गणेश खापरे,अरुण गायकवाड,स्वप्निल सावंत,विजय जाधव, साजेश रामगुडे ,उमेश शेडगे, हरिश्चंद्र शेडगे,रोहित पांढरे,योगेश खापरे,साहिल जाधव,विजय रोहिटेतसेच महिलामंडळातील अनेक महिला कार्यकर्त्या यांचा मोठा सहभाग असतो.

Post a Comment

0 Comments