Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण कोर्टाच्या बाहेर पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीत पोलिसांनाच मारहाण केल्या प्रकरणी चौघांवर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी वेगवेगळया गुन्ह्यातील आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करणे साठी सेंट्रल पोलीस कैदीपार्टी करीता पोलीस कर्मचारी वाहनासह नेमण्यात आली होती.

आरोंपीना कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी आले असता दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास कोर्टाच्या पार्किंगमधील सरकारी पोलीस वाहन क्र.MH12 XQ 6855 हे पार्क केलेले असताना या वाहनामध्ये आरोपी व पोलीस बसलेले होते. त्या वाहनातील आरोपी १) आकाश वाल्मीकी, २) गणेश उर्फ शालु मरोठीया, ३) योगींदर उर्फ भोलु मरोठीया, ४) विवेक यादव (सध्या सर्व रा. आधारवाडी जेल, कल्याण प. यांना कैदीपार्टीच्या गाडीत जागा नसल्याने "तुम्ही सर्वजण पाठीमागे जावुन बसुन घ्या" असे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना बोलल्याचा राग आला.

या रागातून त्यांना शिवीगाळी, धक्काबुक्की करून तसेच युनिफॉर्मची कॉलर पकडुन आरोपीत यांनी दमदाटी करून पो.ना. पेटारे यांच्या  हातावर व चेहऱ्यावर हाताचे चापटीने व ठोश्या बुक्यानी मारहाण करून पाठीमागुन त्यांचे चेहऱ्याचे उजव्या बाजुस जेवणाची कॅरीबॅग आरोपी नं. १ याने जोरात फेकुन मारली. त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूच्या कानास मार लागल्याने व सरकारी कर्तव्य करीत असताना ते सरकारी कर्तव्य बजावु नये व त्यापासुन परावृत करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला म्हणुन त्यांविरूध्द पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी तकार दिल्याने महात्मा फुले चौक पो. स्टे.मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विनोद पाटील हे करीत आहेत.





 

Post a Comment

0 Comments