Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

25 सप्टेंबर हा दिवस जगभरामध्ये गेली अनेक वर्ष एका थीमला अनुसरून फार्मासिस्ट चे आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचे स्थान हे समाजाला, शासन, प्रशासनकर्त्यांना आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांना अधोरेखित करण्याकरिता साजरा केला जातो.यावर्षीची फार्मासिस्ट दिवसाची थीम ..... थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट म्हणजेच आपल्या औषधे आरोग्य विषयक कोणत्याही शंका समस्यांकरता फार्मासिस्ट  हा पर्याय सहज- सुलभ आणि पहिला पर्याय म्हणून आठवावा... अशा आशयाची होती.




 कल्याण शहरामध्ये कल्याण केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदे अध्यक्ष अखिल भारतीय औषध संघटना, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या आणि अनेक सामाजिक उपक्रम मध्ये आपल्या वर्तमानपत्रांमधील लेखातून रुग्ण जागृती करणाऱ्या सौ मंजिरी घरत, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे श्री नितीन मणियार, फार्माको व्हिजिलन्स से तज्ञ प्राध्यापक मकरंद एकातपुरे, ठाणे जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप देशमुख, अनेक ज्येष्ठ फार्मासिस्ट आणि सुमारे 200 हून अधिक कल्याण परिसरातील फार्मासिस्ट च्या हजेरीत हा दिवस साजरा करण्यात आला.

 फार्मासिस्ट ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली,

 पेशंट मध्ये औषधांच्या काही एडवर्स ड्रग रिएक्शन दिसून आल्या तर त्याची नोंद सरकारच्या पोर्टलवर कशी करावी तसेच पेशंटला देखील तसे आवाहन कसे करावे याचे मार्गदर्शन प्राध्यापक मकरंद यांनी दिले. सिम्स व मिम्स या जगप्रसिद्ध औषध विषयक माहिती च्या ई पोर्टलचे प्रात्यक्षिक येथे देण्यात आले. ज्या अन्वये औषधी दुकानांमध्ये फार्मासिस्ट हा उत्तम रुग्ण समुपदेशन करू शकेल.

मॅडम मंजिरी घरत यांनी जगभरातील विविध प्रगत देशांमध्ये सुरू असलेल्या स्पेसिफिक केअर फार्मसी व  आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेले आणि जगभरात मान्यता मिळालेले फार्मसीस्टचे प्राथमिक आरोग्य व्यवस्थेतील कणा असल्याचे नमूद केले. सध्याच्या आभासी आणि ए आय च्या दुनियेत फार्मसीस्टचा प्रत्यक्ष मानवी संवाद -रुग्णांशी केलेला वार्तालाप याचे महत्त्व त्यांनी पटवून  सांगितले. 

श्री अप्पा शिंदे यांनी सध्या मार्केटमध्ये सुरू असलेल्या डिस्काउंट च्या युद्धात होऊ पहात असलेला डुप्लिकेट किंवा नकली औषधांचा सुळसुळाट व त्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलण्याचे आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेला आवाहनानुसार देशभरातील औषध व्यापाऱ्यांनी औषधांवरील कमी केलेल्या जीएसटी चा  फायदा हा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरिता कटीबद्ध असल्याचे  आप्पांनी याप्रसंगी सांगितले. तसेच नारीशक्ती सशक्तीकरणामध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला नारा म्हणजे महिला फार्मसीस्टनी ग्राहकांची आईची आई हो याची देखील आठवण करून दिली, म्हणजे घरातील स्त्रीच्या आरोग्याची- औषधांची, हिमोग्लोबिन -कॅल्शियम डेफिशियन्सी सारख्या चाचण्या करून आईच्या भूमिकेतून ग्राहकांपलीकडे जाऊन त्यांची काळजी घ्या असे हे श्री आप्पांनी याप्रसंगी महिला फार्मसीस्टना पुन्हा आवाहन केले. श्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आप्पांनी ग्राहकांनी स्वदेशी आणि आपला लोकल विश्वासू केमिस्ट फार्मासिस्ट हाच पर्याय निवडावा असेही आग्रहाने सुचवले.  


याप्रसंगी कल्याण शहरातील अनेक ज्येष्ठ फार्मसीस्टचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात कल्याण केमिस्ट असोसिएशनच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत दिसून आली.


Post a Comment

0 Comments