उल्हासनगर महापालिका हद्दीतील १६५ झाडांची, अंबरनाथ पालिका हद्दीत १७१ तर बदलापूर पालिका हद्दीत १६२ झाडांची रेल्वे प्रशासनाद्वारे कत्तल..
मुंबई उच्चन्यायालय यांनी निर्देशित केलेल्या २०१६ च्या जनहित याचिका १५५ च्या आदेशांचे उल्लंघन केल्याने पर्यावरण प्रेमी नाराज़..
उल्हासनगर पश्चिम संजय गांधी नगर रेल्वे स्थानका जवळ रेल्वे प्रशासनद्वारे परवानगी शिवाय अनेक झाडे तोडली.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मा. मुंबई उच्चन्यायालय यांनी निर्देशित केलेल्या २०१६ च्या जनहित याचिका १५५ च्या आदेशांचे हे जाणूनबुजून उल्लंघन आहे. अश्या प्रकारे उल्हासनगर येथील हिराली फाउंडेशन चे वतीने ट्वीट करत व स्थानिक वृक्षमित्र श्री फ़िरोज़ खान यानी विडिओ चित्रीकरण करुन नाराज़ी दाखवली आहे,
एका मिडिया रिपोर्टनुसार रेल्वे मार्गिकेसाठी ५८३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे व त्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांना सहा कोटींचा मोबदला सुद्धा दिला गेला आहे,
कल्याण ते कर्जत या मार्गावर मध्य रेल्वेकडून टाकण्यात येणाऱ्या तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी तब्बल ५८३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या पालिकांच्या हद्दीत जवळपास ५८३ विविध प्रजातींच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या झाडांना पर्यायी वृक्ष लागवड करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिन्ही पालिकांना सुरक्षा अनामत रक्कमेपोटी जवळपास सहा कोटींचा मोबदला दिला आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेल्वेकडून सात वर्षांच्या आत रेल्वे हद्दीत पर्यायी वृक्षांची लागवड करत पालिकांना अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मात्र या कालावधीत वृक्षलागवड न केल्यास पालिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली जाईल,
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून नगरपालिकांना ही झाडे तोडण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता
या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात उल्हासनगर महापालिका हद्दीतील १६५ झाडांची, अंबरनाथ पालिका हद्दीत १७१ तर बदलापूर पालिका हद्दीत १६२ झाडांची कत्तल करण्यात आली आहेत,
मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन इमारत आणि स्थानक परिसराच्या विकास कामात उल्हासनगर येथील ४१ आणि बदलापूर येथील ४१ झाडांची कत्तल करण्यात येणार असून त्यासाठीही दोन्ही पालिकांना रेल्वेकडून अंदाजे ५० लाखांपर्यंत सुरक्षा अनामत रक्कम दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या विकासात ५८३ झाडांची कत्तल करण्यात होत असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments