ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरातील गुरचरण जागेवरील अतिक्रमणावर कल्याण तहसीलदारांकडून कठोर कारवाई करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील विविध भागातील गुरचरण जागेवरील तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे .यापुढेही ही कायदेशीर कारवाई कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.आजच्या कारवाईत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी,तसेच पोलिस प्रशासन यांचाही सहभाग होता.
"नागरिकांनी सरकारी जमीनींवर कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे करू नये,आणि केली असतील तर ती त्वरित स्वतःहून पाडून टाकावी, व सरकारी जमीन मोकळी करावी. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल" असा संदेश तहसिलदारांकडून दिला गेला.
Post a Comment
0 Comments