Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली परिसरसह उल्हासनदी खोर्यातील आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासापासून परिसरात पाऊस सुरु आहे. अधून मधून जोरदार पाऊस कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचले आहे. उल्हास नदी मोहिली परिसरात पाणी दुथडी भरून वाहत असून मोहिली, आणि म्हारळ परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.   

      

उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी किनारी राहणार्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी देत उल्हासनदी पाणी पातळी वाढ पाहता मोहिली म्हारळला जोडणार्या पूलावरील वाहतूक बंद करणार असल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments