ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या घनकचरा विभागातील नवीन ठेकेदार सुमित अल्को पास्ट कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती न करता जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि श्रमजीवी कामगार संघटना कार्याध्यक्ष सुलतान पटेल तसेच संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली यावेळी हि मागणी करण्यात आली.
श्रमजीवी कामगार संघटनेच्या सभासदांची यादी आयुक्तांना देण्यात आली असून आयुक्तांनी मी ठेकेदाराला सांगून प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. त्यावेळेस श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सांगितले की जर आमच्या सभासदांना कामावर घेतले नाही तर येणाऱ्या 25 तारखेला राज्य सफाई कामगार आयोगाचे स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू आम्ही आमच्या हक्काचा लढा कायम पुढे ठेऊ असा इशारा यावेळी दिला. संघटनेचे युनिट प्रमुख तसेच पदाधिकारी अमित साळवे, प्रविण बेटकर, नितीन काळण, सागर सोनावणे, दिनेश तरे, सचिन भाटकर, गौतम सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments