Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठ्या वाहनांना स्टेशन परिसरात प्रवेश बंदी

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण प. मध्ये वालधूनी -  उल्हासनगर कडे जाणाऱ्या  मार्गावर वारंवार अपघात व प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असत. त्यातच  कल्याण रेल्वे स्टेशन जवळील चालू असलेले मेट्रो ट्रेनच्या विकासकामासाठी होणारी जीवघेण्या अडचणीमुळे नागरिकांच्या जीवित्वास धोकाही निर्माण झाला होता. 






अशा वेळी वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी,तसेच वाहतूक  समस्येचे निवारण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय चंद्रकांत बोरे कल्याण पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व  महाविकास आघाडीच्या माध्यमातून कल्याण शहरातील नागरिक तसेच वाहनधारकांना होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या  वतीने सुभाष चौक येथे हाइट बैरिकेटिंग लावण्यासाठी व जडवाहनांना प्रवेश बंदी करुन वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिका आयुक्त व कल्याण शहर वाहतूक शाखा यांना गेल्या अनेक वर्षांपासून पत्र व्यवहार केला. जिथे जिथे अडचणी उद्भवत होते त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष लोकनेते श्री. वंडारशेठ पाटील आणि मा. कल्याण शहर प्रमुख शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिनजी बासरे साहेब, विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर या सर्वांनी आघाडीचा धर्म पाळत सहकार्य केले. म्हणून आज नागरिकांची अडचण सोडविण्यांस मदत झाली आणि ते काम आता पूर्ण झाले असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येईल, ह्या कामाबद्दल शहरातील नागरिक महाविकास आघाडी व त्यांचे कार्यकर्ते ह्यांना मनस्वी धन्यवाद देत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments