Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथ मध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई

                     ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर 

 आज गुरुवारी येथील कल्याण बदलापूर रस्त्यावरील लोटस तलाव परिसरातील राखीव भूखंडा वरील अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात, तसेच नगर रचनाकार,विद्युतविभाग, आणि स्वतः मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानी मोठी तोडक कारवाई केली.

अंबरनाथचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजे पासून ते दुपारी अडीच वाजे पर्यंत अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील, कल्याण-बदलापूर रस्त्यावरील लोटस तलाव परिसरातील ,बगीचा व गार्डन करीता आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक 45,भूखंडा वरील, तसेच जलतरण तलाव करीता आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक 88, वरील जागेवर अतिक्रमण करून केलेली अनधिकृत  21 वाणिज्य दुकानें, 20,व्यावसायिक टपऱ्या, आणि 50,बांधकामा वर तोडक कारवाई केली.


या अगोदर येथील पश्चिम भागातील साईबाबा मंदिर ते विमको नाका परिसरातील 12 अनधिकृत हातगाड्या फेरीवाले, 5 टपऱ्या, तसेच विमको नाका  ते फ़ॉरेस्ट नाका पर्यंत 10 अनधिकृत हातगाड्या 9 टपऱ्या वर पोलीस कर्मचारीच्या बंदोबस्तात, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तोडक कारवाई करण्यात आली आहॆ,

सदर कारवाई मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण प्रमुख नरेंद्र संख्ये, तथा सुनील गावित आणि नगरपालिकेचे खातेप्रमुख व तोडक विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांनी मिळून केली आहॆ.


Post a Comment

0 Comments