Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पावसामुळे इमारतींच्या आवारात सांडपाणी मिश्रित पाणी साचल्याने दुर्गंधीने रहिवाशी त्रस्त

  

एमआयडीसी निवासी परिसरातील

सोसायटीतील प्रकार


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

एमआयडीसी डोंबिवली निवासी मध्ये रस्ते, सांडपाणी वाहिन्या, गटारे, नाले यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका हा रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून एमआयडीसी व केडीएमसी यांच्याकडे तक्रारी करूनही काय उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

         शनिवारी सायंकाळ पासून एमआयडीसी परिसरात जोरदार पाऊस पडला असता निवासी मधील संदेश सोसायटी ( RH-110 ) आणि इतर आजूबाजूच्या इमारती मधील आवारात गुडघाभर पाणी साचले. या पाण्याला घाण, दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे तेथील रहिवाशांचा आरोप असून जर पाऊस रात्रभर सुरू राहिला असता तर हेच घाण पाणी तळमजल्यावरील घरात शिरले असते. पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली असून अजून तीनचार महिने पाऊस पडणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात संभाव्य कधीनाकधी घरात हे पाणी शिरण्याची शक्यता आहे. एमआयडीसी, केडीएमसी प्रशासनाने  याकरता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी संदेश सोसायटी मधील रहिवाशी विनिता सावंत यांनी केली आहे.

             एमआयडीसी मधील भूमिगत सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स या कित्तेक ठिकाणी चोकअप व फुटल्या आहेत. त्यामुळे त्यातील सांडपाणी उघड्यावर वाहत असते. सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीचे काम हे एमआयडीसी कडे आहे. तसेच गटारी, नाले यांची नीट साफसफाई ही झाली नाही. गटारी, नाले यांचे साफसफाईचे काम हे केडीएमसीकडे आहे. पावसामुळे हे सांडपाणी आणि गटारातील पाणी इमारतींच्या आवारात येत आहे. नागरिकांनी याबद्दल तक्रारी केल्यानंतर एमआयडीसी आणि केडीएमसी हे एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करीत असतात. येत्या पावसाळ्यात याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून हे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments