ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
प्रत्येक व्यक्ती मध्ये एक कलाकार दडलेला असतो.फक्त त्याला योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्यामुळे त्याची कला कुठेतरी हरवली जाते.आपल्या सांसारिक जीवनात अनेक स्त्री पुरुषांना आपल्या आवडी निवडी अनेक कारणांनी पूर्ण करता येत नाही.आपल्या नोकरी,व्यवसाय,आपली कौटुंबिक जबाबदाऱ्या यातच त्यांचे अर्धे आयुष्य निघून जाते,आणि मग आपली कला,किंवा हौस पूर्ण करण्याची इच्छा तशीच राहते.ते आपल्या मनातील इच्छा आपल्या मुलांमध्ये बघू इच्छितात,पण हे तितके यशस्वी होत नाही.
अशा स्थितीत वयाच्या अर्ध्यावर आल्यावर आपली हौस, आणि आपली कला मनापासून पूर्ण करण्याची संधी कल्याणातील म्युझिक प्लॅनेट या कराओके स्टुडिओत अनेकांना मिळाली आहे.
कल्याण मधील म्युझिक प्लॅनेट या कराओके सिंगिंग स्टुडिओ द्वारे आपल्या गायक गायकांना एका संगीतमय कार्यक्रमाद्वारे मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.येत्या 15 तारखेला कल्याणातील अत्रे नाट्यमंदिरात रात्री 8/45 वाजता, मेरे जीवन साथी नावाचा सुंदर आणि श्रवणीय असा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे.
म्युझिक प्लॅनेट या कराओके स्टुडिओचे संचालक श्री रवी लुल्ला यांनी आपल्या परिसरातील हौशी गायक गायकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.ह्या कराओके स्टुडिओ च्या माध्यमातून अनेक मध्यमवयीन स्त्री.पुरुषांना आपल्या कलेला वाव मिळाला आहे.
प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार दडलेला असतो,परंतु सर्वांनाच आपली कला जोपासायची किंवा त्यात यशस्वी होण्याची संधी मिळतेच असे नाही.त्याच अनुषंगाने म्युझिक प्लॅनेट या कराओके स्टुडिओत अनेकांना आपली गायनाची आवड आणि आपली कला जगा समोर मांडण्याची संधी मिळाली आहे.
ह्या स्टुडिओत अनेक महिला आणि पुरुष आपल्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या तसेच आपली दैनंदिन कामकाज करून आपली आवड जोपासल्या साठी रोज ह्या स्टुडिओत 2/3 तास येऊन आपल्या गायनाचा सराव करतात, त्यात त्यांना श्री रवी लुल्ला आणि त्यांची पत्नी आरती लुल्ला हे दोघेही गायनासंबंधी मार्गदर्शन करतात.त्याच अनुषंगाने म्युझिक प्लॅनेट स्टुडिओतील गायक गायकांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले जात आहे.शेकडो प्रेक्षकांसमोर आपले गाणे सादर करण्याची संधी मिळते आहे.
ह्याची प्राथमिक तयारी काही दिवसांपूर्वी अग्रवाल कॉलेजच्या हॉल मध्ये आपल्या कलाकारांना रवी लुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करवून घेतली.त्या प्रसंगी
म्युझिक प्लॅनेटचे सर्वेसर्वा रवी लुल्ला त्यांची पत्नी आरती लुल्ला,रश्मी शर्मा अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा, हर्षा राजपूत, श्री प्रकाश मुथा मुथा कॉलेज चे चेअरमन,श्री ओमप्रकाश पांडे,अग्रवाल कॉलेज,चेअरमन,श्री सदानंद तिवारी,कमलादेवी कॉलेजचे चेअरमन,तसेच सुनील लालवाणी,आणि अनेक गायक कलाकार मंडळी उपस्थित होती. ह्या सर्व मान्यवरांनी आपल्या कलाकारांना 15 तारखेच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन त्याचे मनोबल वाढवले.
.jpg)





Post a Comment
0 Comments