Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाईंदरमध्ये १७३ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, संत निरंकारी सत्संग भवन, भाईंदर पूर्व येथे रविवारी  एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची दिव्य शिकवणूक आत्मसात करत मुसळधार पावसाची तमा न बाळगता ‘रक्त नाड्यांमधून वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या दिव्य संदेशाने प्रेरित १७३ निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले, ज्यामध्ये १३० पुरुष तर ४३ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले यांनी या शिबिरामध्ये रक्त संकलन केले. 


या कार्यक्रमाला मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष  रवी व्यास आणि माजी नगरसेवक प्रविण पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला व संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुकही केले. स्थानिक सेवादल युनिट आणि एसएनसीएफचे स्वयंसेवक यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

Post a Comment

0 Comments