ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने इराणी वस्ती परिसरात कारवाई करत एका महिलेकडून ५८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला असून या पदार्थाची अंदाजी बाजारभाव किंमत १ लाख १६ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी रवाना झालेल्या पथकाने कल्याण पश्चिमेतील ९० फुटी रोडवरून अंबिलेकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर स्कुटी वरील महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिची अंगझडती घेण्यात आली. या झडती दरम्यान महिलेकडून मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ सापडला. हि महिला फिजा मनोज इराणी वय २९ वर्ष रा. पाटील नगर, इराणी वस्ती, आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ असून तीच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ चे कलम ८(क),(ब)२० अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेवर यापूर्वी इस.सन २०१९,२०२१,२०२४ साली रोजी खडकपाडा पोलीस ठाणे तसेच २०१८ साली रोजी कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी नाईक नेम कोळशेवाडी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार सदाशिव देवरे, अमित शिंदे, राहुल शिंदे तसेच कल्याण परिमंडळ ३ च्या विशेष पथकातील पोलीस शिपाई सुनीता होडगर, भावना भट यांनी एकत्रितपणे केली असून पुढील तपास खडक पाडा पोलीस करत आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments