ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवली मधील नक्ष नरेश घुंगरी सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याने इंडिया टीम ने पुरस्कृत केलेल्या इंडोनेशिया येथील सेमारांग येथे झालेल्या चॅम्प ऑफ द चॅम्प इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत दोन वेगवेगळ्या रिले रेस या स्पर्धेमध्ये एक नव्हे तर तब्बल दोन कास्य पदक पटकावत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला.
डोंबिवली मधील सामान्य कुटुंबातील मुलगा नक्ष हा अवघ्या वर्षे 11 वर्षाचा असून त्याने स्केटिंग या खेळात केलेली कामगिरी गौरवापद अशीच आहे. नुकत्याच इंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने दोन कांस्यपदके पटकावले खरे पण या स्पर्धेत जाण्यासाठी त्याला अनंत अडचणीला सामना करावा लागला. आई आणि वडील दोघेही क्रीडा क्षेत्रामध्ये असल्या मुळे लहानपणापासूनच खेळाची आवड, त्यामुळे स्केटिंग या खेळात काहीतरी करून दाखवायची ही जिद्द बाळगून सराव करत होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाण्यासाठी फक्त इनलाइन स्केटिंग ची आवश्यकता असते. स्पर्धा ही इनलाइन स्केटिंग वरच होते.
स्केटिंग हा खेळ थोडासा महागडा असल्यामुळे या खेळाकडे सामान्य खेळाडू सहसा प्रयत्न करत नाहीत. अशा अनेक संकटावर मात करत नक्ष ने सराव चालू ठेवला. आई-वडिलांनी प्रयत्न करून त्याला इनलाइन स्केटिंग घेऊन दिले. स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदत उभी केली. ह्या सर्व संधीचं नक्ष ने इंडोनेशियामध्ये दोन पदक मिळवत आई-वडिलांना तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना नक्कीच रिटर्न गिफ्ट दिलं असं म्हणावे लागेल.
डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असलेल्या सुरभि घुंगरी आणि नरेश घुंगरी यांच्या एन जी स्केटिंग अकॅडमीच्या नक्ष ह्याने ५00 मीटर अंतराच्या झालेल्या दोन रिले रेसेसच्या दोन्ही शर्यतीत दोन कांस्यपदकांवर आपले नाव कोरले, मात्र वैयक्तिक रिंक रेस प्रकारात नक्ष नरेश घुंगरी याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या अटीतटीच्या झालेल्या शर्यतीत नक्ष याला शेवटच्या फेरीत आपला वेग वाढवत अंतिम रेषा पार करताना सहा सेकंद कमी पडले त्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तरीही नक्ष ने हार न मानता इंडिया टीम तर्फे रिले रेस मध्ये भाग घेऊन १ कांस्यपदक पटकावले आणि मिक्स टीम रिले रेसमध्ये १ कांस्यपदक मिळवत आपले, आपल्या पालकांचे आणि आपल्या देशाचे नाव मोठे केले.
नक्षने आतापर्यंत त्याने बऱ्याच स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवला आहे. तसेच वेगवेगळ्या स्केटिंगच्या १.३० तास नॉन स्टॉप स्केटिंग चालवण्याचे रेकॉर्ड केले आहेत. नक्षला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत तर्फे नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड ग्रेड A ह्या पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे. नक्षला क्रीडा क्षेत्रात स्केटिंगची जशी आवड आहे त्यासोबत किक-बॉक्सिंग आणि फुटबॉल मध्ये सुद्धा आवड आहे. नक्ष जसे स्केटिंग स्पर्धेत पदके पटवतो तसे त्याने किक-बॉक्सिंगमध्ये १ जिल्हा पातळीवर कांस्यपदक व १ राज्य पातळीवर सुवर्ण पदक पटकावले आहे.
नक्षने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments