"नागरिक संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क
राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे.
भारताच्या संरक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना
सैनिकी प्रशिक्षण दिलं पाहिजे" प्रमोद हिंदुराव
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
देशाची परिस्थिती पुढच्या काळामध्ये सक्षम करायची असेल, देशाला संरक्षित ठेवायचे असेल तर सतर्क राहील पाहिजे. सतर्क राहण्यासाठी सुद्धा पुढचा भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिम्मत करणार नाही असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले. आज असलेल्या मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर हिंदुराव यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी प्रमोद हिंदुराव यांच्यासह माया कटारिया, विनोद भोईर, प्रमोद खरात, रश्मी कोलते, रेखा सोनवणे, भगवान साठे, उदय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या गृह खात्याचे अभिनंदन करत 72 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशांमध्ये आपल्या काही भागांमध्ये त्याचा निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला या पुढच्या काळामध्ये कुठल्याही त्रास होणार नाही. याची काळजी केंद्र सरकार राज्य सरकार घेतोय आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नागरिक संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे. भारताच्या संरक्षणासाठी सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिलं पाहिजे असे हिंदुराव यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या परिसरामधून मुंबईला पाणी जातं. परंतु ह्याच परिसरातील नागरिकांना दर वर्षी पाण्यासाठी व्याकुळ होण्याची वेळ येत असते. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी स्पष्ट केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments